आपल खान्देशमहाराष्ट्र

आमदार किशोर पाटील यांनी नौटंकीबाजपणा बाजूला ठेवून प्रत्यक्ष कृती करून दाखवावी- अमोल शिंदे

पाचोरा – येथील आमदार किशोर पाटील यांनी काल महावितरण विरोधात ताळाठोको आंदोलन केले त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणी संदर्भात स्वतःहा सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे.याचा समाचार घेत भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार किशोर पाटील फक्त नौटंकीबाज माणूस असून त्यांनी आता हा नौटंकीबाजपणा बाजूला ठेवून प्रत्यक्ष कृती करून दाखवावी, राज्यात सत्ता त्यांची आहे. मुख्यमंत्री त्यांचे पक्षाचे आहेत ऊर्जामंत्री यांच्या महा विकास आघाडीचे आहेत ते स्वतः आमदार आहेत.हे ते विसरून गेले आहेत का ? जर त्यांना खरच शेतकऱ्यांचा एवढा कळवळा आहे. तर त्यांनी मुख्यमंत्री अथवा ऊर्जामंत्र्यांकडून तसा आदेश आणुन शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी थांबवावी, पण ते फक्त आंदोलनाची नौटंकी करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.तसेच जनतेने नाकारलेल्या नेतृत्वाची पक्षाकडून दखल घेतली जात नसल्याने उसने अवसान आणून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याकरिता, तसेच जिल्हा पक्ष संघटनेत विनवण्याकरून सुद्धा आमदारांच्या कार्यकर्त्यांना स्थान दिले गेले नाही.म्हणुन शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करून स्वतःच्या सरकार विरोधात आंदोलन करून पक्षश्रेष्टीचे लक्ष वेधून घेण्याचा केवीलवाणा प्रयन्त आमदारांकडून केला जात आहे. परंतु शेतकरी बांधव यांचा नाटकीपणा चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळे आंदोलनाला कार्यकर्त्यांपेक्षा पोलीसांचीच संख्या जास्त होती, आणि ह्या महाशयांनी स्वतःला अटक झाल्याचे दाखवुन पोलीस स्टेशनला जाऊन अधिकाऱ्यांच्या दालनात ए.सी.मध्ये बसुन चहापान केला याला कुठली अटक म्हणायची हा तर फक्त नाटकीपणा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे