महाराष्ट्र

राजमाता अहिल्यादेवी जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वितरण

कराड (प्रतिनिधी) अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ च्या वतीने २५०० गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणार आहे असे प्रतिपादन प्रविण काकडे यांनी केले ते अहिल्यादेवी याच्या २९६ व्या जयंतीनिमित्त बोलत होते कोरोना मुळे इंडिया गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत म्हणून खऱ्या अर्थानं अहिल्यादेवी होळकर यानी दातृत्वाची भावना ठेवून या देशावर २९ वर्ष लोकाभिमुख राज्य कारभार केला अहिल्यादेवी याचे दातृवाला व कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट याचे वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंती दिनांक ३१|५|२०२१ धोडेवाडी ता कराड येथे साजरी करण्यात आली यापसंगी जेष्ठ नागरिक श्री तातोबा काकडे यांचे शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले, याप्रसंगी, गोरगरीब विद्यार्थी यांना वही पेन वाटप करण्याचा शुभारंभ मा प्रविण काकडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऑल इडिया धनगर समाज महासंघ यांचे शुभ हस्ते करण्यात आला

कोरोना च्या महामारी संकटामुळे डोंगर दऱ्याखोऱ्यातील गोरगरीब समाज बांधव विद्यार्थी अर्थिक संकटात सापडलेला आहे म्हणून गेल्या वर्षीच २०२० रोजी २२९३ विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून याही वर्षी ३१|५| २०२१ पासून २५०० विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य हित्य वाटप मदत करून सामाजिक बांधिलकीतून समाज हितासाठीच अहोरात्र काम करून उल्लेखनीय कार्य करत राहणार आहे तसेच कोरोना काळात मध्ये पोलीस प्रशासन यानी महत्त्वपूर्णयोगदानदिलं आहेम्हणून सर्व पोलीस कर्मचारीवर्ग यांना बिसलरी वाटप व बिस्किट पुडे वाटप करण्यात आले सुरुवात पाचवड फाटा येथुन कराड तालुका पोलीस स्टेशन चे API श्री राजु डांगे व सोसायटी चेअरमन प्रकाश काकडे,यांचे शुभ हस्ते करण्यात आले प्रदीप काकडे, पोपटराव काकडे, मनोज काकडे, सुजीत गलांडे, ओंकार काकडे, सरगर, संकेत काकडे, हर्षवर्धन काकडे, शुभम काकडे, रामचंद्र काकडे, विकास गडाळे, आबासाहेब गडाळे, सुरज काकडे उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे