हुतात्म्यांच्या पवित्र भूमीत स्वातंत्र्यसैनिक व वारसदारांचा कृतज्ञता सोहळा, आमदार किशोर पाटील व शिवसेनेचा पुढाकार…
हुतात्म्यांच्या पवित्र भूमीत स्वातंत्र्यसैनिक व वारसदारांचा कृतज्ञता सोहळा
हुतात्म्यांच्या पवित्र भूमीत स्वातंत्र्यसैनिक व वारसदारांचा कृतज्ञता सोहळा
आमदार किशोर आप्पा पाटील व शिवसेनेचा पुढाकार
पाचोरा | स्वातंत्र्याच्या लढ्यात आयुष्य पणाला लावणाऱ्या, कारावास भोगणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या दडपशाहीला न जुमानता स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला कृतज्ञतेची मानवंदना देण्यासाठी पाचोऱ्यात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या वतीने ‘स्वातंत्र्य लढ्यातील समर्पित स्वातंत्र्यसैनिक कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
सदर हा सोहळा आज शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे होणार आहे. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांसोबतच त्यांच्या वारसदारांचाही सन्मान करून त्यांच्या कुटुंबांनी जपलेल्या स्वातंत्र्याच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे.
पाचोऱ्याच्या स्वातंत्र्यलढ्याला बलिदानाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. ‘चले जाव’ आंदोलनाच्या काळात पाचोरा शहरातील गांधी चौकात ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात स्वातंत्र्यसैनिकांनी हौतात्म्य पत्करले. त्यामुळे या भूमीशी स्वातंत्र्यसंघर्षाच्या शौर्याची आणि त्यागाची नाळ जोडलेली आहे. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कृतज्ञता सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो ज्ञात-अज्ञात देशभक्तांनी कारावास, लाठीमार, हालअपेष्टा आणि कौटुंबिक विरह सहन केला. अनेकांनी मातृभूमीसाठी हसत हसत मृत्यूला कवटाळले. त्यांच्या त्यागाची जाणीव पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, स्वातंत्र्याचे मोल समजावे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांप्रती समाजाची कृतज्ञता व्यक्त व्हावी, या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
- मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारसदारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून भुषण अहिरे, प्रांताधिकारी पाचोरा; राजेंद्र चिंचोले, करिअर मार्गदर्शक; बापु रोहम, पोलीस उपअधीक्षक पाचोरा; विजय बनसोडे, तहसीलदार पाचोरा; राहुल पवार, पोलीस निरीक्षक पाचोरा; तसेच मंगेश देवरे, मुख्याधिकारी पाचोरा उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. सुनिता किशोर पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा पाचोरा; रावसाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष शिवसेना; गणेश भिमराव पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा-भडगाव; सुमित किशोर पाटील; किशोर बारवकर, उपनगराध्यक्ष पाचोरा; राजेंद्र पाटील, तालुका प्रमुख शिवसेना; विनोद तावडे, शिवसेना तालुका प्रमुख; समाधान पाटील, शिवसेना तालुका प्रमुख भडगाव; सुधाकर पाटील, शिवसेना तालुका प्रमुख भडगाव; जितेंद्र जैन, युवासेना जिल्हाप्रमुख पाचोरा; सुमित सावंत व भोला पाटील, शिवसेना शहरप्रमुख पाचोरा; अजय चौधरी व नंदकिशोर देवरे, शिवसेना शहरप्रमुख भडगाव; प्रवीण ब्राह्मणे भीमशक्ती जिल्हाप्रमुख; संजय गोहील, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक पाचोरा; तसेच सुनिल पाटील, शेतकरी सेवा जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानासोबत त्यांच्या वारसदारांचाही गौरव केला जाणार आहे. त्यांच्या कुटुंबांनी जपलेल्या आठवणी, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
आज स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना त्यामागील संघर्ष आणि बलिदान विसरता कामा नये. पाचोऱ्याच्या गांधी चौकात स्वातंत्र्यासाठी सांडलेले रक्त, तुरुंगवास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा संघर्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जपलेल्या स्मृती हा पाचोऱ्याचा गौरवशाली वारसा आहे. या वारशाला नमन करणारा हा कृतज्ञता सोहळा पाचोऱ्याच्या राष्ट्रभक्तीच्या इतिहासातील एक अर्थपूर्ण अध्याय ठरणार आहे.
कार्यक्रमाचे संपर्क व संयोजन गजु पाटील आणि रविभाऊ पाटील (माजी नगरसेवक) पाहणार आहेत. स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे वारसदार, कुटुंबीय तसेच राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कृतज्ञता सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
संपर्क : गजु पाटील – 9921211677 | रविभाऊ पाटील – 9226432730
दिनांक : शनिवार, १५ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी १०.३० वाजता
स्थळ : शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा
आयोजक : शिवसेना-युवासेना, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी, पाचोरा-भडगाव


