आपल खान्देशब्रेकिंग

Pachora | तालुक्यातील नगरदेवळा ते आखतवाडे दरम्यान रोडवरील मानमोड्या नालावरील ब्रिटिश कालीन फरशी पुरात गेली वाहून..

तालुका सार्वजनिक बांधकाम विभाग यावर उपाय योजना करते यावर लक्ष लागून आहे. 

  • संजय परदेशी -पत्रकार 

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा ते आखतवाडे हा मार्ग अनेक गावांना जोडणारा रस्ता आहे, या रस्त्यावर मानमोड्या नावाचा मोठा नाला असून ह्या ब्रिटिश काळातील फरशीवरील डांबरीकरन पुरात वाहून गेल्याने मोठा अपघात होऊ शकतो म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरच दुरुस्त करावी अशी मागणी होत आहे.

पाचोरा तालुक्यातील मोठी बाजार पेठ असलेले नगरदेवळा गावात आखतवाडे, बदरखे, नेरी, वडगाव, दिघी, येथिल शेतकरी व सामान्य नागरिकासाठी येण्या जाण्यासाठीचा हा प्रमुख रस्ता मानला जातो, नगरदेवळा नागद मार्गे चाळीसगावासाठी रोज मोठया प्रमाणात वापरात येणारा हा रस्ता असून सदर रस्त्यावर मानमोड्या नावाचा मोठा नाला असून त्यावरील ब्रिटिश काळातील फरशी वरील डांबरीकरण पावसाच्या पुरामुळे  वाहून गेल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना धोके दायक ठरत आहे. भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकरता येत नाही त्या आधी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने निरीक्षन करून लवकरच दुरुस्त करावा अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.

सबंधित अभियंता यांना सदर माहिती नागरिकांनी दिली असून तालुका सार्वजनिक बांधकाम विभाग यावर उपाय योजना करते यावर लक्ष लागून आहे. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे