आपल खान्देशब्रेकिंग

पाचोराशहरांत आठ दिवसांचा कडक जनता कर्फु जाहीर; जाणून घ्या कोणत्या सुविधा सुरू राहतील

पाचोरा : राज्यातील चैन ब्रेक नंतर हि पाचोरा शहरासह तालुक्यात 15 ते 22 मे कडक लॉकडाऊन (lockdown) करण्याचा निर्णय स्थानिक आ किशोर अप्पा पाटील यांनी सर्वपक्षीय व व्यापारीच्या सहमतीने घेतला आहे. आरोग्य विभागाशी निगडीत अत्यावश्यक सेवा (emergency service) वगळता बहुतांश सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याने कोरोना उद्रेक टाळण्यासाठी होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत आहे. सध्या जरी लॉकडाउन असले तरी अनेक नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. शिवाय भाजीबाजारात नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. लॉकडाउन असूनही नागरिकांमध्ये भीती राहिली नसल्याने बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून येत आहे. चैन ब्रेक नंतर हि त्यामूळे कडक जनता कर्फु करण्याची मागणी सामान्य नागरिकांतून होत होती.

यामध्ये किराणा, भाजीपाला यासह इतर सर्वच अस्थापना बंद असणार आहेत. दरम्यान , एटीएम, विद्युत, गॅस सिलेंडर सुविधा मात्र सुरू राहणार आहे.

दूध वितरण फक्त सकाळी 7 ते 9 व संध्या 6 ते 8 राहील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे