आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

शेतीच्या वादातून भरदिवसा मुलाने केला बापाचा खून..

शेंदुर्णी येथील तरंगवाडी शिवारात वाटणीच्या वादातुन मुलाने बापाच्या डोक्यात पावडे घालुन यमसदनी पाठविल्याची धक्कादायक घटना घडली असून आरोपी मुलगा फरार आहे. तर आरोपीच्या मुलाने बापा विरोधात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील शेतकरी मयत नाना बडगुजर (वय ८२) हे सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत होते. ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा आरोपी कैलास नाना बडगुजर (वय ५६) हा शेतात आला आणि वडीलांसोबत वाटणीवरून वाद घालू लागला. वडीलांनी नकार दिला असता त्यांच्यात शाब्दीक वाद झाला आणि आरोपी कैलास याने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या पावडयाने डोक्यात जोरात वार करताच नाना बडगुजर हे जागेवरच कोसळले. आरोपीचा मुलगा आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशाल याने डोक्यात वार केल्याचे आरोपीचा मुलगा आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशाल याने डोक्यात वार केल्याचे बघताच धाव घेत आरोपी वडीलांच्या हातुन पावडे हिसकावून जखमी बाबांना सावरण्याचा प्रयत्न केला. ते कोणतीही हालचाल करीत नसल्याचे बघुन आरोपी याने शेतांमधुन पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरल्याने घटनास्थळी धाव घेत पोलीसांना खबर दिली.

शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, शशिकांत पाटील पोकाँ. प्रशांत विरनारे, शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मयत यांना पहुर ग्रामिण रुग्णालयात हलविले आणि घटना स्थळाचा पंचनामा करीत साहित्य ताब्यात घेतले. तसेच आरोपी मुलगा कैलास बडगुजर याचा शोध सुरु असुन पथके रवाना करण्यात आली आहेत.

सदर घटनेची फिर्याद आरोपीचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (वय ३३) याने दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम ३०२ नुसार गुरं ४९१ / ३०२ नुसार पहुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिलीप पाटील करीत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे