ब्रेकिंग

पाचोरा तालुक्यात एका विवाहितेवर अत्याचार, मुलाला ठार मारण्याची धमकी…

पाचोरा तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार करण्यात आला तसेच विवाहितेच्या लहान मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. विवाहितेने प्रतिकार केल्यानंतर तिला विळा मारून जखमी करण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात महेंद्र गोविंद गुजर (पुनगाव, ता.पाचोरा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाचोरा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात 24 वर्षीय विवाहिता मुलासह नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील महेंद्र गोविंद गुजर याने महिलेला मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच याला प्रतिकार केला असता महिलेवर विळ्याने वार करून हाताला दुखापत केली आहे. हा प्रकार गेल्या दिड महिन्यांपासून ते 29 ऑगस्ट रोजीच्या रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडला. पीडीतेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महेंद्र गोविंद गुजर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे