ब्रेकिंग

Pachora पाचोऱ्यात रेल्वे ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याचा पर्दाफाश..

पाचोऱ्यात रेल्वे ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याचा पर्दाफाश..

पाचोरा (झूम मराठी) पाचोरा शहरातील रेल्वेच्या ई – तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

पाचोरा शहरात तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती क्राईम इंटेलिजन्स ब्रांच भुसावळ यांना मिळाली असता त्यांच्या पथकाने  पाचोरा शहरातील द वृंदावन पॅलेस इंटरनेट कॅफेवर धाड टाकत त्यावरून योगेश वाणी नामक संशयित दुकान चालकाकडून प्राथमिक माहितीनुसार कॉम्प्युटरचे १८ यूजर आयडी पैकी त्यातील ४ बंद व उर्वरित १४ यूजर आयडी वरून सुमारे १७ हजार रुपये किंमतीची ८ तिकिटे, एक सीपीयू व एक मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेतलेला असून जळगाव आरपीएफ कडे संशयितास सुपूर्त करण्यात आले असून, जळगाव आरपीएफ तर्फे संशयीताकडून सविस्तर तपशील घेण्याचे काम सुरू असून, याबाबत पुढील तपास जळगाव आरपीएफ निरीक्षक अधिकारी महेंद्र पाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ एस. बी. चौधरी हे करीत आहेत, रेल्वे कायदा १४३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहॆ.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे