आपल खान्देशकृषीवार्तामहाराष्ट्रराजकीय

नांदगाव तालुक्यातील शेती पिकाचे शंभर टक्के पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देईन -आमदार सुहास कांदे


नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथा परिसरावर झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी मंगळवारी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून दोन दिवसात परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे शंभर टक्के पंचाळांनी करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले . असून यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या त्वरित वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. 

आज  मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागातील घाटमाथ्यावर असलेल्या बोलठाण, जवळकी, जातेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्षात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पाहून आमदार भावुक झाले. वर्षभर पोटच्या मुलासारखे पीक जपून नैसर्गिक आपत्तीने क्षणात नाहीसे होणे अतिशय वेदनादायी आहे. मीही शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने मला याची पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडू नका आमदार व सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. लवकर लवकर आपल्याला ही झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील असे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी बोलताना दिले. 

 याप्रसंगी नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार, नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे सर्व कर्मचारी, तसेच बोलठाण ग्रामपंचायतचे सरपंच वाल्मीक गायकवाड, अनिलतात्या रिंढे, रफिक पठाण, गोकुळ कोठारी, गुलाब चव्हाण, मनोज रिंढे, अनिल सोनवणे, गणेश व्यवहारे, संदीप सूर्यवंशी, भाऊसाहेब सूर्यवंशी, बंडू पाटील, गुलाब पाटील, भरत गायकवाड, नाना थोरात, अंकुश पगारे, मारुती सोनवणे, रमेश पाटील, बोलठाण ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे