आपल खान्देश

व्हिडीओ – गिरणा नदिवरील भटगावं पुल धोकादायक स्थितीत!

  • दिलीप जय परदेशी

झूम मराठी पाचोरा | चाळीसगाव पूर आल्याने झालेल्या दुर्घटनेचा धडा अद्याप भडगाव व पाचोरा मधील यंत्रणेने घेतलेला दिसत नाही. पाचोरा भडगाव सिमेंवर असणारा पुलावरून भडगावं तालुक्यातील भटगाव, बांबूरुड, पिंपळगावं पुनगाव या गावाना जोडणाऱ्या भटगावं पुल हा आठ दिवसांपूर्वी झालेल्या पूरपरिस्थितीमुळे धोकादायक स्थितीत आला आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी कठळे नाहीत. पुलावर असलेला रस्ता खचला असून त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे लोक पुलावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालतात किंवा प्रवास करतात.

भटगाव गिराणा नदीवर असणाऱ्या या छोट्या पुलाचे काम कित्येक वर्षापासून याची दुरुस्ती झालेली नाही . मागील आठवड्यातील गिराणाला पूरआल्याने सदर पूलवरील रस्ते उखडले गेलेले आहेत. येथे राहणारे स्थानिक रहिवासी सांगतात. ट्रॅक्टर गेला तर बाजूने चालणाऱ्यांना कंपने जाणवतात. गावांना जोडणारा भटगावं पूल हा रहदारीचा महत्त्वाचा दुवा आहे. या पुलाचे ऑडिट करून, दुरुस्ती करणे आवश्यक आहे, याकडे स्थानिक लक्ष वेधतात. भटगावमधील नागरिक सांगतात, दोन ते तीन वर्ष झालेत या पुलाचे काम झाले नाही, व पुला लगत रस्त्यावर खड्डे पडत पडलेले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे