आपल खान्देशगुन्हेगारी

पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार!

झूम मराठी न्यूज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावातील एक 11 ते 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच सहा ते सात संशयित तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार दि.14 रोजी पहाटे उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तालुक्यातील कायदा सुव्यवस्था प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कळमसरे तेथील 11 ते 13 वयोगटातील अल्पवयीन मुलगी (minor girl)आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी दि. 13 मे रेाजी रात्री 9 वाजता गल्लीतील मैत्रीणी सोबत बोलत होती. त्यानंतर मात्र ही अल्पवयीन मुलगी अचानक रात्रभर गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध करण्यात आला.

मुलीचे नातेवाईक आणि गावातील ग्रामस्थांनी परिसरातील आजूबाजूच्या शेतात रात्रभर शोधमोहिम राबविली. परंतु मुलगी मिळून अली नाही. प्राप्त माहितीनुसार या अल्पवयीन मुलीला गावातील काही तरुणांनी उचलून नेत तिच्यावर रात्रभर सामूहिकरित्या अत्याचार  केला आणि पिडीत मुलीला पहाटे 3 वाजेच्या सुमारास या नराधमांनी गावातील महिलांच्या शौचालयाजवळ सोडून दिले.अशी चर्चा आहे.

रात्रभर गायब असलेली अल्पवयीन मुलगी पहाटे घरी आल्यावर हा प्रकार उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीला पाचोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ आणि वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले पिडीत मुलीचे जबाब घेऊन या घटनेबाबत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

संशयित पाच/सहा आरोपी हे गावातीलच असल्याची माहितीही प्राथमिक तपासात निष्पन्न झाली असून आरोपींना पिंपळगाव पोलिसांनी चौकशीसाठी अटक केली आहे. या पैकी काही तरुण सज्ञान असून एक संशयित आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते! याप्रकरणातील संशयितांवर विरुद्ध , पिंपळगाव हरे पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी प्रमोद उर्फ पप्पु संजय चौधरी, वय-22 वर्ष, मंगेश संभाजी चौधरी वय-22 वर्ष, ज्ञानेश्वर सुरेश उशीर, वय 19 वर्ष 4) योगेश उर्फ मयूर संभाजी चौधरी, वय 24 वर्ष, कैलास शिवाजी चौधरी, वय 32 वर्ष भावेश उर्फ भैय्या सुनिल बाघ वय-19 वर्षे, सर्व रा. कळमसरा, ता पाचोरा अशांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे