महाराष्ट्र

IPS कृष्ण प्रकाश यांनी 200 कोटींची वसुली केली? पोलिसाच्याच व्हायरल पत्राने काही काळ गोंधळ ; अखेर सत्य समोर..

आयपीएस कृष्ण प्रकाश यांनी 200 कोटींची वसुली केल्याचा दावा करणारे एक पोलिसानेच लिहिलेले पत्र व्हायरल झाले. कृष्ण प्रकाश यांसारख्या कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असणाऱ्या ऑफिसरबाबत असे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

सदर पत्र अशोक डोंगरे यांच्या नावाचा वापर करण्यात येऊन लिहिले आहे. या प्रकरणी एपीआय अशोक डोंगरे यांनी मी अर्ज केला नाही असे म्हटले आहे. या व्हायरल पत्रात नेमकं काय म्हटलं आहे? : कथित अर्जदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी पत्रात म्हटले आहे की, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून यापासून मला संरक्षण मिळावे. मी तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुख पद माझ्याकडे सोपविण्यात आले. शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून येणारी करोडो रुपये मला स्वीकारण्यास सांगितली. आत्तापर्यंत कृष्ण प्रकाश यांच्यासाठी गोळा केलेली रक्कम 200 करोड रुपये पेक्षा जास्त आहे.

या पत्रानंतर गोंधळ उडाल्यानंतर प्रत्यक्षात डोंगरे यांनी हे पत्र आपण लिहिले नसल्याचा दावा एपीआय डोंगरेंनी केला आहे. ते लिहून बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारवाईची मागणी त्यांनी आज (ता.६) पोलिस आय़ुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. डोंगरे यांनी पुढे म्हटले आहे की, मी वाचक म्हणून काम करत असताना काही पत्रकारांच्या, सामाजिक कार्यकर्ते यांच्या नावाचा उल्लेख करून माझ्या व तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या बाबत खोट्या मजकुराची असंबंध माहिती लिहून माझी व तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदनामी करण्यासाठी बनावट दस्ताऐवज मुख्यमंत्री यांच्या नावे तयार केला असल्याचे म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे