रोहिले बुद्रुक येथील स्वस्त धान्य वेळेवर मिळत नसल्याने व व्यवस्थित वाटप करत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार.
रोहिले बुद्रुक येथील स्वस्त धान्य वेळेवर मिळत नसल्याने व व्यवस्थित वाटप करत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार.
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रोहिले बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानदार प्रकाश पवार स्वस्त धान्य वेळेवर व व्यवस्थित वाटप करत नसल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे.
रोहिले बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकान हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गट यांच्याकडे कित्येक वर्षापासून स्वस्त धान्य दुकान चालवतात परंतु येथील बचत गट स्वतः धान्य वाटप करत नसून रोहिले बुद्रुक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पवार हे बोलठाण येथे राहत असून ते येथील स्वस्त धान्य दुकानदार दुकानातील धान्य वाटप करत आहे. परंतु शासनाने दिलेल्या प्रत्येक रेशन धारकांना नियमानुसार धान्य वाटप करत नसून ते धान्य वेळेवर वाटप करत नाही तसेच शासनाने लॉक डाऊन च्या काळात मोफत धान्य व विकत धान्य पैकी एकच कोठा आतापर्यंत वाटप केला आहे. यात हा दुकानदार धन्यवाद वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करून भ्रष्टाचार करत आहे. सदर दुकानदार हा प्रथम येथील नागरिकांकडून हाताचा थब घेऊन नंतर प्रत्यक्षात धान्य कमी प्रमाणात येतो. ऑनलाइन त्या नागरिकांच्या नावे शासनाने दिलेल्या नियमानुसार धान्य वाटप केल्याची नोंद होते. परंतु प्रत्यक्षात तसे तो धान्य प्रत्येक रेशन धारकांना धान्य वाटप करत नाही अशा तक्रारी येथील ग्रामस्थांनी केली असून याबाबत आम्ही शासनाकडे या बचत गट करत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार आहोत अशी माहिती येथील ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार, उपसरपंच सुनंदा तुकाराम बागुल, ग्रामस्थ संजय पवार, रवींद्र बागुल ग्रामस्थांनी माहिती दिली. सदर बचत गटाकडून स्वस्त धान्य दुकान दुसऱ्या नवीन गटाकडे देण्यात यावा याबाबत शासन आणि प्रशासन यांच्याकडे तक्रारी करणार असून महाराष्ट्र राज्याचे नागरी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करणार आहोत अशी माहिती येथे सरपंच व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.


