आपल खान्देशमहाराष्ट्र

कुटूंबाचा काळच बनलाय कोरोना..बारा दिवसात परदेशी परिवारातील पाचवा बळी 

कुटुंबावर दुःखाचे आघातवर आघात होत आहेत. ‘आता बस झाले देवा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

 

राजेश सोनावणे 

सावदा (जळगाव) : जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ असला तरी तो अकाली येऊ नये, ही अपेक्षा सर्वांनाच असते. कारण घरातील कर्त्या व्यक्तीचे अकाली निधन झाले, की ते कुटुंब अडचणीत येते. पण मृत्यू कधी आणि कसा येईल, हे सांगणे कठीण असते. त्यातही एकाच कुटुंबातील जर पाच जण एकापाठोपाठ मृत्यूचे शिकार होत असतील तर ही नुसतीच चिंतेची बाब नाही, तर कुटुंबाला व समाजमनालाही सुन्न करणारी घटना आहे. अशीच अतिशय हृदयद्रावक घटना कुटुंबीयांवर कोसळले आहे. न पेलणारे दुःख येथील परदेशी कुटूंबावर कोसळले आहे.

कोरोनामुळे नुकत्याच चार जणांच्या मृत्यूच्या दुःखातून हे कुटुंब सावरत नाही, तोच बुधवारी (ता. ३१) रात्री या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने या कुटुंबावर दुःखाचे आघातवर आघात होत आहेत. ‘आता बस झाले देवा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

३५ जणांचे एकत्र कुटूंब पण…

आठ ते दहा दिवसांत कोरोनामुळे येथील परदेशी कुटुंबातील चार जणांचा बळी गेला आहे आणि बुधवारी पुन्हा याच कुटुंबातील रामसिंग परदेशी ऊर्फ राजू परदेशी (वय ५८) यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. (स्व.) गणपतसिंह परदेशी यांचे सहा मुलांचे व एकूण ३५ जणांचे मोठे कुटुंब आहे. त्यापैकी काही वर्षांपूर्वी दोन ज्येष्ठ बंधूंचा, एका मुलीचा तर आता कोरोनामुळे तीन भावांचा मृत्यू झाला. सहा भावंडांपैकी आता केवळ एकच भाऊ संतोषसिंग परदेशी हयात आहे. त्यांना तीन भाऊ, एक सून व वृद्ध आईच्या मृत्यूचे डोंगराएवढे दुःख सहन करण्याची व कुटुंबातील सदस्यांना आधार व धीर देण्याची वेळ आली आहे. लागोपाठ आठ ते दहा दिवसांत कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने या परदेशी कुटुंबाची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही करवत नाही.

अखेरच्या क्षणीही दर्शन नाही.. 

कोरोनामुळे मृत्यू झाल्याने इच्छा असूनही कुटुंबातील सदस्य जिवाच्या माणसाचे अखेरच्या क्षणीदेखील अंतिम दर्शन घेऊ शकत नाही, तर अनेक नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रमंडळी मृत कुटुबांच्या दुःखात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही. अशी वित्रित्र व तितकीच केविलवाणी, दयनीय परिस्थिती निर्माण झाल्याचे समाजात दिसत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे