पाचोरा तालुक्यातील ओझर गावातील खरे घरकुल लाभार्थी वंचित! प्रशासनाने दखल न घेतल्यास आमरण उपोषण करणार!!
घरकुल यादीतील वंचित राहिलेल्या लोकांनी एकत्रित येउन पंचायत समिती यांना अर्ज दिला या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन खऱ्या लाभार्थींना लाभ मिळावा असे अनेक अर्ज दिले! पण काही उपयोग झाला नाही.
तालुका पाचोरा ओझर येथील ग्रामसभेत 2016 च्या डिक्लीयर यादीतून घरकुल लाभार्थींची नावे वगळली व फसवणूक करण्यात आली
पाचोरा (प्रतिनिधी ) तालुक्यातील ओझर गावातील घरकुलांच्या यादीत मोठे बदल करून छेडछाड केली त्यामुळे खरे लाभार्थी डावलले गेले प्रपत्र “ड” नुसार ज्यांची नावे होती ती वगळली गेली त्यामुळे ज्ञानेश्वर सोनवणे व घरकुल यादीतील वंचित राहिलेल्या लोकांनी एकत्रित येउन पंचायत समिती यांना अर्ज दिला या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन खऱ्या लाभार्थींना लाभ मिळावा असे अनेक अर्ज दिले! पण काही उपयोग झाला नाही. आजही निकषानुसार घरकुल यादी 2016 नुसार लाभार्थ्यांना घरकुल न मिळाल्याने पाचोरा पंचायत समितीने दखल न घेतल्याने ज्ञानेश्वर सोनवणे वेळ प्रसंगी मुंबईला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असेही त्यांनी स्पष्ट केले!
ज्ञानेश्वर हिरामण सोनवणे सामाजिक कार्यकर्ता यांनी ओझर गावातील गरजू व लाभार्थींसाठी घरकुलांच्या यादीत ग्रामपंचायत यांना नाव दिले होती त्यानुसार ग्रामसभेत प्रपत्र “ड” ठराव क्रमांक “7 “Generated Priority List नुसार मंजूर करण्यात आली!त्यांनतर परत 2018 व 2019 च्या कालावधीत कॉन्ट्रॅक्ट बेस वर लावलेले कॅंडिडेट यांनी प्रत्येकी शंभर रुपये घेऊन सदरच्या घरकुलांच्या यादीत मोठे बदल करून छेडछाड केली त्यामुळे खरे लाभार्थी डावलले गेले प्रपत्र “ड” नुसार ज्यांची नावे होती ती वगळली गेली त्यामुळे ज्ञानेश्वर सोनवणे व घरकुल यादीतील वंचित राहिलेल्या लोकांनी एकत्रित येउन पंचायत समिती यांना अर्ज दिला या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन खऱ्या लाभार्थींना लाभ मिळावा असे अनेक अर्ज दिले! पण ते अर्ज देऊन काही उपयोग झाला नाही अनेक वेळेस अर्ज करूनही पंचायत समितीचे बीडीओ व अधिकारी धस यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यानंतर ज्ञानेश्वर सोनवणे यांनी जिल्हाधिकारीउपमुख्ययं कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जळगाव पाचोरा तहसीलदार पाचोरा प्रांत यांना सुद्धा पत्र दिले! आजही निकषानुसार घरकुल यादी 2016 नुसार लाभार्थ्यांना घरकुल न मिळाल्याने पाचोरा पंचायत समितीने दखल न घेतल्याने ज्ञानेश्वर सोनवणे यांनी आमरण उपोषण दिनांक 18//10//2020 रोजी पंचायत समिती समोर सुरू केले सदर उपोषण मागे घेण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने बीडीओ व अधिकारी धस आणि सभापती यांनी सदर 2016 च्या घरकुल यादीतील लाभार्थींना शासनाकडून न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले! व आमरण उपोषणाची सांगता केली! तसेच पाचोरा पंचायत समितीत काही अधिकारी क्लार्क यांच्या बदल्या पाच ते सात वर्षापासून झालेल्या नाही! त्यांची वरिष्ठ विभागाकडून चौकशी करून बदली करण्यात यावी!त्यामुळे गैरकारभार भ्रष्टाचाराला आळा बसेल! परत दोन वर्षे बदली झाली की पाचोरा हे कुठतरी थांबल पाहिजे! परतुं आज ही ते आश्वासन खोटे ठरले त्यामुळे ज्ञानेश्वर सोनवणे व त्यांचे सहकारी मुंबई येथे मंत्रालय गाठणार त्यांची कशी फसवणूक झाली हे सगळे कथन ते मंत्रालयात ग्रामपंचायत विभागात कागदपत्रांसह माहिती देणार असे त्यांनी सांगितले व वेळ प्रसंगी मुंबईला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असेही त्यांनी स्पष्ट केले!



