महाराष्ट्रराजकीय

रोहित पवारांनी केली पडळकरांची तक्रार थेट मोदी आणि नड्डांकडे

मुंबई | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर टीका केली होती. याचे पडसाद संपूण महाराष्ट्रात आगी सरखे पसरत आहेत. त्यांच्या टीकेनंतर बुधवारी संध्याकाळी त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यावरून पडळकर यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत.

रोहित पवारांची पडळकरांविरोधात मोदी-नड्डांकडे तक्रार

“विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात भाजपचे एक ‘महान नेते’ पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. आपण लक्ष घाला”, अशी विनंती करणारं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. ट्विटरवरुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत मोदी-नड्डांना टॅग करुन पडळकरांविरोधात तक्रार केली आहे

.काय म्हणाले रोहित पवार?

“विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे आणि आजवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ती संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज्यात भाजपचे एक ‘महान नेते’ पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना खालच्या पातळीवर पोहोचले आहेत…”

“आपल्याकडे स्त्री ला देवी मानून म्हणून तिची उपासना करण्याची संस्कृती आहे पण त्या ‘थोर’ नेत्याने आपल्या वक्तव्यात महिलांचा अनादरही केला आहे आश्चर्य म्हणजे राज्यातील अन्य कोणत्याही भाजपा नेत्याने त्यांना फटकारले नाही, किंवा त्यावर भाष्यही केले नाही….”

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे