आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

राजकारणापलीकडचं बहिणीचं प्रेम; वैशालीताईंनी भावांना घरपोच दिली राखी..!

पाचोरा, (प्रतिनिधी )भारतीय जनता पक्षाच्या पाचोरा तालुक्यातील नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीच्या नात्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच लोकहितोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी शहर व तालुक्यातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे.

रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वतीने पाचोरा शहरातील आपल्या लाडक्या भावांना घरपोच राखी देण्यात आली. बहिणीच्या प्रेमाचा, स्नेहाचा आणि विश्वासाचा प्रतीक असलेली ही राखी भावांच्या मनगटावर बांधताना बहीण-भावाच्या नात्यातील आपुलकीचा धागा आणखी घट्ट झाला.

राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकीची नाती जपणे आणि सुख-दुःखाच्या प्रसंगी आपल्या भावंडांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हा या उपक्रमामागील भावनिक संदेश आहे. घरपोच आलेल्या या प्रेमळ राखीमुळे अनेक भावांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जपलेला हा स्नेहबंध आणि आपुलकीचा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरत असून, वैशालीताई सूर्यवंशी यांच्या या जिव्हाळ्याच्या उपक्रमाचे नागरिकांकडून मनःपूर्वक कौतुक होत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे