डोक्यावरील हंडा हाती आला
शनिवार दिनांक २५ / ९ / २०२१
रोजी मौजे आंबेडोह येथे हब फस्ट अबुधाबी बॅक व हॅबीटट फॉर ह्यूमिनिटी इंडिया यांच्या सौजन्याने आंबेडोह येथे 42 कुटुंबांना व पायरवाडी येथे 88 असे एकूण 130 वॉटरव्हील वाटप करण्यात आले. तसेच पायरवाडी येथील 30 कुटुंबांना मोफत शौचालय बांधून देणार.
यावेळी नेहमीच वेगवेगळ्या संस्थांकडून, NGO कडून मदतीचा ओघ मिळवून देणारे सन्मा.केंद्रप्रमुख श्री लक्ष्मीकांत परदेशी साहेब ,श्री कुमार वेखंडे सर सौ भाग्यश्री मडके मॅडम ,सौ छाया देशमुख मॅडम आणि श्री विजय कडव सर हे उपस्थित होते
ही मदत मिळवून देण्यासाठी श्री.योगेश परदेशी सर(वासिंद) यांचे मोठे योगदान लाभले.
तसेच श्री लक्ष्मीकांत परदेशी साहेब आणि श्री कुमार वेखंडे सर यांची संस्थेकडे सततची मागणीला यश प्राप्त झाले. तसेच आंबेडोह शाळेचे श्री विजय कडव सर यांचे विशेष सहकार्य लाभल्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
सौ छाया देशमुख मॅडम यांनी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्री विजय कडव सर यांनी आभार व्यक्त केले
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा