आपल खान्देशब्रेकिंग

भडगाव तालुक्यातील लोण पिराचे वीज सबस्टेशन, ज्या ठिकाणी लोकांचे कामे व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी शिजत होते मास.. 

 

शासकीय कार्यालय बनलं पार्टीचा अड्डा लोन पिराचे येथील वीज सबस्टेशन मध्ये सुरू असलेल्या या बकरा मटण पार्टीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे, शासकीय कार्यालय हे नागरिकांच्या सेवा-सुविधेसाठी आहेत का कर्मचाऱ्यांना पार्टी करण्यासाठी आहेत???  असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

भडगाव तालुक्यातील लोन पिराचे येथील वीज सबस्टेशन मध्ये दिनांक 5 फेब्रुवारी 2025  बुधवारी साय. 4:30 वाजता  कार्यालय अधिकारी समवेत कर्मचाऱ्यांनी केली मटण पार्टी करत मज्जा करते वेळीच,  कर्मचाऱ्यांची ही घटना समजताच एका प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधि त्या ठिकाणी पोहचले असता तेथे मास शिजतांना दिसले व कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. या घटनेचे छायाचित्र प्रतिनिधिने कॅमेऱ्यात कैद केले असून यावर काय कारवाई होते ते बघणे महत्वाचे ठरणार आहे..

लोन पिराचे येथील वीज सबस्टेशन मध्ये कार्यालयीन वेळेतच दारू, बकरा पार्ट्यांसह, महफिल रंगत असते आणि एक मिडीयाचा प्रतिनिधि कॅमेरा घेऊन धडकतो… ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अशी प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आजतागायत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कठोरता दिसून येत नाही. अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढत असून ते न घाबरता शासकीय कार्यालयात ओली-सुकी पार्टीसाठी नेहमीच एकत्र येतात. खेदाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी लोकांचे कामे व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या विखुरलेल्या दिसतात.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे