फेक लोन – 25 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु पाचोऱ्यातील युवकास एक ते सव्वा लांखाचा फटका..!
लोन अॅप कंपनीकडून धमक्यांद्वारे एक ते सव्वा लाखाचा फ्रॉड करण्यात आला.
झूम मराठी वृत्त
मागील काही वर्षात ऑनलाइन फ्रॉडची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. एखाद्या लिंकवरुन, अँप वरुन फ्रॉड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच आणखी एक प्रकार नुकताच पाचोरा शहरात उघड झाला असून एका लोन अॅपद्वारे पूर्णेद्र वाघे नामक व्यक्तीची मोठी फसवणूक झाली आहे.
पाचोरा शहरातील पूर्णेद्र वाघे नामक व्यक्तीने लोन अॅपद्वारे (Loan App)25 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. परंतु त्याला तब्बल एक ते सव्वा लांखाचा फटका बसला. त्या व्यक्तीला 90 दिवसांचा सांगून परंतु लोन घेतल्याच्या पाचव्या दिवशी दुप्पट परतावा परत करण्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांत त्या व्यक्तीला लोन ऍप वाल्यांकडून धमकीचे कॉल येऊ लागले.
सुरुवातीला कॉल करणाऱ्या व्यक्तीने आठवडाभरात 40 हजार रुपये परत करण्याचं सांगितलं. आणि ते भरलेही कर्ज घेतलेल्या व्यक्तीने App वर तपासणी केली असता, त्याच्या कर्जाबाबत कोणतीही माहिती दाखवली जात नव्हती. त्याला कॉलसह आता व्हॉट्सअॅपवरही (WhatsApp) वरही धमक्या मिळू लागल्या होत्या लोन कंपनीकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तीला मोबाइल फोनमधील फोटो, महत्त्वाचे डॉक्युमेंट, कॉन्टॅक्ट लिस्ट असे डिटेल्स WhatsApp वर पाठवण्यात येऊ लागले.
आपले मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि इतर माहिती कर्ज देणाऱ्या अॅपकडे पोहोचल्याचं पाहता व्यक्ती अतिशय घाबरला, त्याला एका आठवड्यात पैसे परत न केल्यास सर्व मॉर्फ केलेले अश्लील फोटो लीक केले जाण्याची धमकी दिली गेली. मग त्याने आपल्या जवळ असलेली बाईक गहाण ठेऊन 30 हजार रुपये त्यांना पाठवले. तरीही त्यांची पैसे मागण्याची मागणी सुरु राहिली.सदर व्यक्तीचा स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन उपयोग झाला नाही. त्याने यूट्यूब वर फेक लोनचे जाळे कसे असते. कश्या प्रकारे फसवले जाते आपण काय करायला हवं त्याने धडे घेत आपन असे फसलो? आपण काय करायला हवे यातून तो निघत गेला.
देशात सायबर फ्रॉडची (Cyber Fraud) अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अनेकांची यात मोठी फसवणूक झाली आहे. असे अनेक अॅप्स आहेत, ज्याद्वारे फ्रॉडस्टर्स ऑनलाइन फसवणूक करतात. काही फ्रॉडस्टर्सने कोणत्याही कागदपत्रांशिवाय गाडी घेण्यासाठी लोन दिलं आहे. अशाप्रकारचे अॅप कोणत्याही कागदी कारवाईशिवाय पाच मिनिटांत केवळ आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे लोन देण्याची ऑफर देतात. खराब सिबिल स्कोर असणाऱ्यांना इन्स्टंट लोन देण्याचं सांगून त्यांची फसवणूक करतात.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात सध्या 600 हून अधिक लोन देणारे फेक अॅप्स (Fake Apps) उपलब्ध आहेत. जर तुम्हीही असे अधिकृत नसलेले फेक अॅप डाउनलोड केले असतील, तर लगेच डिलीट करा. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं.



