कृषीवार्ता

औरंगाबादच्या शेतकऱ्यांचा ‘तांबडी भेंडी’चा प्रयोग यशस्वी!

औरंगाबाद : आपल्या सर्वांना भेंडीची (Okra) भाजी माहित आहे. भेंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या चवदार भेंडीच्या भाजीचे हिरव्या रंगातील विविध प्रकार आपल्याला बाजारात पाहायला मिळतात, मात्र औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक तांबडी भेंडी (Red Okra) लागवडीचा प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील झाला आहे. पाचोड (Pachod) परिसरात या भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तसेच ही तांबडी भेंडी रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवणारी असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जात आहे.

पाचोड येथील शेतकरी प्रकाश गायकवाड (Prakash Gaikwad) यांच्यासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी तांबड्या भेंडीची लागवड केली. एक एकरमध्ये चार बाय एक-दोन फूट अशा अंतरावर या भेंडीची लागवड करण्यात आली. शिवाय गायकवाड यांनी ही भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्याचा दावा केला आहे. तसेच तांबड्या भेंडीचे वाण हे वाराणसी भाजी अनुसंधान केंद्राकडून विकसित करण्यात आले आहे.

सरासरी दीड महिन्यानंतर तांबड्या भेंडीचा पहिला तोडा होतो. या भेंडीचे पाच ते सहा तोडे केले जातात. सुरुवातीला औरंगाबादच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजारपेठेत या भेंडीला ३१ ते ३२ रुपये किलोचा बाजारभाव मिळाला. त्यानंतर मात्र, भाव घसरणीला लागले. कारण लाल रंगांची भेंडी सुरुवातीला ग्राहकांना चकित करत होती. त्यामुळे सुरुवातीला विक्रीत अडचण आल्याचे उत्पादकांनी सांगितले. मात्र विक्री व्यवस्थापन साधले तर शेतकऱ्यांना फायदेशीरही ठरू शकते.

तांबड्या भेंडीचे फायदे (Benefits of Red Okra)

या भेंडीत अ, ब व क जीवनसत्त्व (Vitamins A, B, C) साधारण ३० टक्के प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचेही सांगितले जात आहे. गर्भवतींना भेंडीची भाजी अतिशय उपयुक्त ठरते. कर्करोगास नियंत्रण करणारे घटक या भेंडीत असतात. पचण्यास हलकी. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपकारक. या तांबड्या भेंडीला गोव्यातून अधिक मागणी असल्याचे जाधववाडी कृषी उच्चतम बाजार समितीतील भेंडी विक्री व्यवसायातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे