महाराष्ट्र राज्यातील 55000 हजार शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्न मार्गी लावणाऱ्या शुभांगी पाटील
आंदोलन काय असते हे शुंभागी पाटील महाराष्ट्र टीचर्स असोशियन प्रमुख यांनी आझाद मैदानावर स्वतः अनुभवले सात दिवस अन्नपाणी न घेता स्वतः अनुभवले आणि आंदोलन यशस्वी झाले! आंदोलनामुळे शक्ती मिळाली एका शिक्षकाने केलेल्या आत्महत्या मुळे अन्नपाणी सोडलं कदाचित माझा हा त्याग नुकसान करणारा ठरू शकतो परंतु राज्यात विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षक आणि देशाचा अन्नदाता शेतकरी आत्महत्या करत असेल तर राज्यकर्त्यांसाठी ही बाब लाजिरवाणी आहे राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न घेऊन पुन्हा 55000 हजार शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र टीचर असोशियन महाराष्ट्र स्टुडंन्ट असोशियनच्या माध्यमातुन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मी आणि माझे सहकारी लढत आहे!आणि लढत राहणार असे उदगार शुभांगी ताई पाटील यांनी आझाद मैदान येथे आंदोलनाच्या वेळी काढले!आपले जीवन पूर्ण शिक्षकासाठी आणि विद्यार्थीसाठी मी वाहुन घेतले!मराठी जिल्हा परिषद सरकामान्य शाळा वाचविल्या शिवाय पर्याय नाही! अनेक ठिकाणी सरकारी शाळा बंद करून खाजगीकरण होताना दिसत आहे!त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकावर उपासमारीची वेळ भविष्यात येणार असल्याची खंत शुभांगी ताईनी व्यक्त केली!शाळेचे खाजगीकरण करणारे आपलेच आपण निवडुण दिलेले आमदार खासदार मंत्री आहेत!स्वतःचा स्वार्थ पाहाणारे आपल्या नावाने शाळा सुरु करणे हे व्यवस्थेच्या विरोधी कार्यक्रम आहेत!हे जनतेला समजण्याची गरज आहे!

तर शुभांगी पाटील यांनी जे कार्य केल त्या कार्यक्रमाची दखल केंद्र सरकारने आणि राज्याने घेतली पाहिजे होती!पण सरकारी कामे कशी असतात!हे जवळुन पाहायला मिळते!असो चांगले आणि एक महान कार्य करणार्या शुभांगी ताई पाटील यांना महिला दिनानिमीत्त झूम मराठी न्यूजच्या वतीने हार्दीक शुभेच्छा!



