आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत शाळापुर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न


भडगाव (झूम मराठी) भडगाव शहरातील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत आज “शाळा पुर्व तयारी मेळावा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला..सदर मेळावा नविन दाखल पात्र विद्यार्थी व पालकांना साठी आयोजित करण्यात आला होता…मेळाव्यात विद्यार्थी विकासात्मक विविध सात स्टॉल लावण्यात आले होते..सदर मेळाव्यास पालक व विद्यार्थी यांचा अभुतपुर्व प्रतिसाद लाभला…सदर प्रत्येक स्टॉल जाऊन पालक व विद्यार्थी यांनी समक्ष भेट देऊन विद्यार्थी क्षमता व कलागुण शिक्षकांकडुन तपासण्यात येऊन त्यांना यथा योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

येथे पहा व्हिडीओ

 शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांनी पालकांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थी जीवनातील प्राथमिक शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. संपूर्ण मेळावा शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.. मेळावा यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका संगिता शेलार, सुनिता देवरे, अनिता सैंदाणे, शिक्षक सचिन पाटील, रविंद्र पांडे, अनंत हिरे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, सुयोग पाटील, शिपाई चंद्रकांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे